आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. देशातलं पण वातावरण बदलायची वेळ आली आहे, असं म्हणत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. मुंबईतील विक्रोळीमधील संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्या 411 कुटुंबीयांच्या नवीन घरांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. देशातलं पण वातावरण बदलायची वेळ आली आहे. राजकीय वातावरण बदलायाचं आहे. इतर पक्ष चावी मारण्याचं काम करत असतात. आपण चावी वाटण्याचे काम करत आहोत. शिवाय शब्द दिलेला असतो तो पाळायचा असतो, शब्दाचे वाटप होऊ शकत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, मागील सरकारने पाच वर्षांत फक्त गाजर वाटपाचा कार्यक्रम केला आहे. मात्र, आम्ही तुम्हाला चावी वाटपाचा कार्यक्रम करत आहोत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये जनतेनं भाजपला जमिनीवरच ठेवलं; संजय राऊतांचा टोला
चिपी विमातळाच्या श्रेयावरून भाजपची पोस्टरबाजी; शिवसेनेला डिवचलं
राष्ट्रवादीचा भाजपला दणका; भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश