आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथल्या घटनेवरुन तसेच राज्यात सुरु झालेल्या ड्रग्स प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.
देशात अंमली पदार्थांचा काळाबाजार अद्यापही सुरूच आहे. जगातील सर्वात मोठा ड्रग्ज साठा सापडला त्यासंदर्भात केंद्र सरकारने कोणतेही ठोस पाऊले उचलले नाहीत., अशी टीका संजय राऊतांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशात जिवंत शेतकरी चिरडले गेले. पण त्याच वेळी देशातील मीडिया शेतकऱ्यांच्या मागे उभा न राहता ड्रग्ज प्रकरणाला जास्त प्राधान्य देत आहे. गुजरातमध्ये 21 कोटींचे ड्रग्स सापडले त्याचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
उत्तर प्रदेश हे राम राज्य नाही, तर किलींग राज्य; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
आगामी काळात शिवसेना बॅक टू पॅव्हेलियन होऊ शकते; रामदास आठवलेंच्या विधानानं राजकीय चर्चांना उधाण
“आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची ‘या’ पक्षासोबत युती?”