आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत द्यावी, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन केंद्र सरकारकडून मदत मागावी, अशी मागणी केली.
विरोधी पक्ष महाराष्ट्रात राजकारण करत आहे. गुजरातला मदत केली जाते महाराष्ट्राला नाही. यात राजकारण होतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून जास्त मदत आणावी, त्याला राजकारण म्हणणार नाही, त्यांना शाब्बासकी मिळेल, असं नाना पटोले म्हणाले. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, ओल्या दुष्काळाबाबत आणि शेतकऱ्यांच्या मदतीबाबत येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे. तातडीने शेतकऱ्यांना मदत व्हावी, अशी मागणीही काँग्रेसकडून यावेळी करण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादी ‘त्या’ जागेवर महिलांना देणार संधी?; पक्षाच्या गोटात चर्चा रंगल्या
एकनाथ खडसेंनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले कसे?; गिरीश महाजन यांचा सवाल
शरद पवारांवर असलेल्या प्रेमापोटी अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत- जयंत पाटील
विधानसभा निवडणुका कधीही होवो, स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज- चंद्रकांत पाटील