आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत, मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक झाली असून, त्यांनी या फेररचनेविरोधात थेट राज्यपालांकडे दाद मागितली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात जनतेने कोर्टात दाद मागावी, असं आवाहन केलं होतं. मात्र, नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी नाशिक मनसेने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे पुन्हा एकदा तीन सदस्यीय फेररचनेची मागणी केली आहे.
दरम्यान,निवेदन राज्यपालांना देण्यात आले आहे. सोबतच मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम यांनी सोमवारी याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेस पक्ष हेडलेस, भाजप त्याचा फायदा घेतंय, अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावा- संजय राऊत
“पवारसाहेबांना पंतप्रधान, तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवू नका”
“किरीट सोमय्यांनी लायकीत रहावं, केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल”
खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका; आमदार चंद्रकांत पाटलांच मोठ वक्तव्य