नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
558

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र लगेच रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूरही झाला. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आता या प्रकरणामध्ये विरोधी पक्षनेत्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जेंव्हा कोणतीही व्यक्ती स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपडत असते तेंव्हा तो खरा राजा नसतो, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

दरम्यान, अमृता फडणवीसांनी यापूर्वीही अनेकदा सातत्याने महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”

“अफगाणिस्तान हादरलं! काबूल विमानतळावर 2 मोठे बाॅम्बस्फोट”

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेनं मारण्याची भाषा केली; संजय राऊतांनी केला खुलासा

“सांगलीत जयंत पाटलांविरोधात भाजप आक्रमक, पालकमंत्री हटाव आंदोलन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here