मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महानगरपालिका कार्यकारी अभियंता सुमिता शिर्के यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. मात्र या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ या मौन बाळगून होत्या. यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.
स्वत: च्या पक्षाच्या आमदारांना गुन्हा पाठिशी घालणाऱ्यांना दर मिनिटाला खोटं बोलावं लागतंय. एकाच वेळी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात. ही मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचीच लक्षणं आहेत. हा आजार अतिशय भयानक आहे. चित्रा वाघ यांनी वेळीस तपासणी करून तब्येतीची काळजी घ्यावी, असा उपरोधक टोला रूपाली चाकणकरांनी यावेळी केला
महत्वाच्या घडामोडी –
राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा बनलाय; नवाब मलिकांचा हल्लाबोल
‘काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय घेतंय कोण?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा घरचा अहेर
भाजपच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा लहान फोटो; मनसेने केली भाजपवर नाराजी व्यक्त
ग्लेन मॅक्सवेलची विस्फोटक खेळी; आरसीबीचा राजस्थानवर 7 विकेट्सने दणदणीत विजय