आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सामय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी कोल्हापूरच्या मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गैरव्यवहार केल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पत्रपरिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
‘हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने 1500 कोटींचा घोटाळा केला. ही वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या’, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
“ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळा करण्याची एक कला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी विकसित केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे करायचे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीची दखल त्यांना घ्यावी लागणार. कारण अस्तित्वात नाही. अज्ञात कंपनीच्या नावाने बॅंक अकाऊंटद्वारे पैसे आपल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये घेतला आहे. पोलिसांना पुरावे दिले आहेत” असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत; पंकजा मुंडेंची टीका
शिवसेना नेत्यांवरील ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही- सुधीर मुनगंटीवार
पोटनिवडणुकीने निघाला भाजपा-मनसे युतीचा मुहूर्तच; आणखी ‘या’ 4 ठिकाणी युती होणार!
ईडीची नोटीस अनिल परबांना अन् छातीत धडकी उद्धव ठाकरेंच्या; नितेश राणेंचा टोला