आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पालघर : गेल्या महिन्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं.
त्यातच आज पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसेनं भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असं या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. मात्र असं असतानाच राज्यातील मनसे – भाजपची अखेर पालघरमध्ये युती झाली आहे.
पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्री करणार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”
“सोलापूरात मनसेचा झंझावात; नामांकित लोकांनी केला मनसेत प्रवेश”
रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता ‘या’ तारेखला होणार?; राजेश टोपेंनी दिली माहिती
काँग्रेसमध्ये खळबळ; काँग्रेसचा ‘हा’ नेता करतोय भाजपाच उमेदवाराचा प्रचार