“नारायण राणेंच्या  सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही”

0
714

मुंबई : भाजपची आजपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू होत आहे . केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यावरुन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. भाजपने तो चोरला आहे, असा आरोप करत  नारायण राणेंच्या  सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी राणेंना केली आहे.

नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यापूर्वी वाभाडे काढले होते. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणातल्या सेनेची ताकद कमी होणार नाही, नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही,असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

राणेंना शिवसेनेनेच दोन वेळा पराभव दाखवून दिला. राणे म्हणजे पनवती, त्यांना भाजपने अनेक ठिकाणी फिरवावंच. त्यामुळे भाजपचीच ताकदच कमी होईल, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला .

महत्वाच्या घडामोडी –

जेवढ्या उंचीची आहे मी, तेवढीच लायकी ठेवा; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या

पत्नीला किस करायला गेला आणि…; नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल

“डाॅ.भागवत कराड पंकजा मुंडेंच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रीतमच्या नावाने जोरदार घोषणाबाजी”

आमच्या नादी लागू नका, पालकमंत्र्यांच्या नादी लागला तर शहरातही दिसणार नाही- गुलाबराव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here