Home महाराष्ट्र शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आवाज येईल, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नको- सुधीर मुनगंटीवार

शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आवाज येईल, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नको- सुधीर मुनगंटीवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. शिवसेना काँग्रेस विचाराची कदापि होऊ शकणार नाही, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलं होतं. गीतेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

अनंत गीते यांचे वक्तव्य शिवसैनिकांची प्रामाणिक भावना आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. तसेच शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याची, नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. एकच आवाज येईल, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे हे ‘पोलिटिकल सुसाईड’ आहे. ही युती नकोच.’,असंही मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं. ते एका वृत्तवाहिनिशी बोलत होते.

दरम्यान, संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएच. डी. करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचे जेवढे कौतुक करत नाहीत त्यापेक्षा जास्त शरद पवारांचे करत असतात., असा टोमणा मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“परभणीत शिवसेनेला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

शरद पवारांमुळे अजित पवारांना संधी मिळाली पण, त्यांनी ती…; निलेश राणेंची टीका

राष्ट्रवादी-शिवसेनेचे 14 नगरसेवक फुटणार! भाजपाचा मोठा दावा

…तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी- सुधीर मुनगंटीवार