आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी कोल्हापूरला जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालेलं असेल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.
किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले असताना, त्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून त्यांना खुली धमकी देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय? मविआ सरकारने लक्षात असू द्याव्यात की, उद्या किरीट सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर त्याच क्षणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार बरखास्त झालेले असेल, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात”
सरकारच्या दडपशाहीचा हिशेब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही; अतुल भातखळकरांची टीका
पैठण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेग; पंकजा मुंडे लिहिणार नितीन गडकरींना पत्र
मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला अधिक आवडतो- प्रीतम मुंडे