आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपरोधक टोला लगावला.
मुख्यमंत्री जर मुंबईच्या बाहेरजात असतील तर ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी फक्त मुंबईच्या बाहेर न पडता महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं. सरकारच्या बाहेर पडून त्यांनी भाजप आणि आरपीआयसोबत यावं., असं आठवले म्हणाले.
दरम्यान, शिवसेना वाचवायची असेल तर त्यांनी आपल्या निर्णयात बदल करणे गरजेचे आहे. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर सेना-भाजप एकत्र येऊ शकतात, असं मतही रामदास आठवलेंनी यावेळी व्यक्त केले.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध
“…तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल”
“कर्णधार विराट कोहलीचा मोठा निर्णय, टी-20 वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडणार”
“चंद्रपुरात शिवसेनेला मोठा धक्का, 7 नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश”