Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला विरोध वाढत आहे. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केला आहे. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करणार असल्याचे जाहीर केले.

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केला. मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आणि सुमित खांबेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याची परवानगी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाकडे मागितली होती.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल”

“कर्णधार विराट कोहलीचा मोठा निर्णय, टी-20 वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडणार”

“चंद्रपुरात शिवसेनेला मोठा धक्का, 7 नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश”

उत्तर प्रदेशचं रणांगण जिंकण्यासाठी रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला; म्हणाले…