उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं संजय राऊतांना वाटतं- देवेंद्र फडणवीस

0
324

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, असं म्हटलं. असं वाटत असेल ते चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, असं फडणवीस म्हणाले. पण उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार म्हणाले दौरे टाळा; अतुल भातखळकर, म्हणतात…

“अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, आजचा दुसरा टी-20 सामना रद्द”

“ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले”

राज्यपालांनी भाजप आमदाराला सोबत घेऊन दाैरा करणं, हे कितपत योग्य?; अमोल मिटकरींचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here