5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात संरक्षण भिंत उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

0
426

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर आपत्कालिन आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे हे वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत.

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी ही संरक्षण भिंत उभारली जाणार आहे.

समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी ही संरक्षण भिंत बांधणार आहे. 5 जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

दरम्यान, येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी, भिलवडीतील पूरग्रस्तांशी संवाद”

“मत मागायला याल, तेंव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”

ओबीसींबद्दल केंद्राला राग, समाजाचे नुकसान करण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र

“मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here