Home देश “मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा”

“मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा”

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू, असं बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटक सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात म्हटलं.

कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, असं येडियुरप्पा यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. 25 जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन., असं येडियुरप्पा यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच; नितेश राणेंचा घणाघात

“महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं निधन”

पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत; राज्य सरकारची मोठी घोषणा

कृष्णेचं पाणी उद्या सकाळी 52 तर सायंकाळी 47 फूट होईल; पाटबंधारे उपअभियंता लालासाहेब मोरेंनी दिली माहिती