“शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात, अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांकडून अटक”

0
493

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर केतकीला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

अभिनेत्री केतकी चितळेनं शरद पवार यांच्याविषयी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे आज दिवसभर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. केतकीनं तिच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांवर खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी टीका केली. जितेंद्र आव्हाडांसह सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केतकीवर कारवाईची मागणी केली. तिच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांचं आभार मानलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा

“केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”

राज ठाकरेंची वाढती सुरक्षा पाहून मनसे नेते बाळा नांदगावकर संतापले, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here