मुंबई : भाजपने काढलेल्या जनआशिर्वाद यात्रेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरूच आहेत. यातच भाजप नेते नितेश राणे यांनी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला होता.
सात तारखेचं नेमकं काय झालं हे पहिलं सांगितलं पाहिजे होतं. सात तारखेला मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते येणार होते. काल तारीख अधिकृत जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना फोन गेला. मी आधीही म्हटलो होतो, शिवसेना म्हणजे वेड्यांची जत्रा आहे. स्वत:च्या मुख्यमंत्र्यांना वेडं बनवण्याचं काम हे लोक करतायेत, असा घणाघात नितेश राणेंनी केला होता. यावरून आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणे हे शिवसेनेत मोठे झाले. शिवसेना ही येड्यांची जत्रा आहे म्हणणारे नितेश राणेंनी नारायण राणे हे सुद्धा या जत्रेत होते हे नितेश राणेंनी लक्षात घ्यावं. मग, नारायण राणे हे महायेडे आहेत का? असा घणाघात गुलाबराव पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“राणे कुटूंबीय म्हणजे येड्यांची जत्रा झालीये”
माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच- धनंजय मुंडे
सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही; नवाब मलिक यांचं मोठं विधान
बेळगावात मराठी माणसाचा नव्हे, तर राऊतांच्या अहंकाराचा पराभव- देवेंद्र फडणवीस