नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलताना, हिंदू असो वा मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं होतं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल, असा उपरोधत टोला नाना पटोलेंनी यावेळी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं, असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
अनिल देशमुखांबाबतची भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट करावी- केशव उपाध्ये
ठाण्यात ‘या’ पोस्टरची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेसने मानले पंतप्रधानांचे आभार
‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही?’; संजय राऊतांची भाजपवर टीका