Home महाराष्ट्र अनिल देशमुखांबाबतची भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट करावी- केशव उपाध्ये

अनिल देशमुखांबाबतची भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट करावी- केशव उपाध्ये

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होतं की, आपण सीबीआय, ईडी कडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे साह्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे., असं उपाध्ये म्हणाले.

दरम्यान, आता देशमुख हे का गायब आहेत, ते जनतेसमोर, तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत, याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस ने तातडीने करावा, असंही उपाध्ये यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

ठाण्यात ‘या’ पोस्टरची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेसने मानले पंतप्रधानांचे आभार

‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही?’; संजय राऊतांची भाजपवर टीका

ठाकरेंची इलेव्हन सेना दिवाळीपर्यंत तरूंगात जाईल,आव्हाड तुम्हीही बॅग तयार ठेवा; किरीट सोमय्यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या बुडीत शेती कर्जमाफीचा निर्णय करा, केवळ ट्विट नको- राजू शेट्टी