भाजपच्या ‘या’ महिला आमदारांची होणार घरवापसी?; जयंत पाटलांची घेतली भेट, चर्चांना उधाण

0
699

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आमदार मंदा म्हात्रे या राष्ट्रवादी कार्यालयात गेल्या होत्या, तिथं त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

हे ही वाचा : अमृता फडणवीस यांचं नवं ट्वीट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाल्या…

भाजप आमदार मंदा म्हात्रे या खरंतर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा मंदा म्हात्रे या बऱ्याच काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात गेल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे.

या भेटीदरम्यान, त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत बातचीत केली. या वेळी झालेल्या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय.

दरम्यान, मंदा म्हात्रे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे आता राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मंदा म्हात्रे या पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत की काय, अशी चर्चा चालू आहे, मात्र याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

महत्वाच्या घडामोडी – 

“शिवसेनेचा काँग्रेसला दणका, ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी”

“आगामी निवडणूकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यांनं दिला आमदारकीचा राजीनामा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here