Home महत्वाच्या बातम्या थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; ‘या’ भाजप खासदारचा दावा

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार; ‘या’ भाजप खासदारचा दावा

मुंबई : ठाकरे सरकार सत्तेत स्थापन झाल्यापासून ते सरकार पडणार असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठे विधान केलं आहे.

थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे, असा दावा विखे यांनी केला. केंद्र सरकारच्या योजनेचा आढावा घेण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील कर्जत तालुक्यात दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 72 हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणाऱ्यांना 50 हजार रुपये विशेष सवलत जाहीर केली. ती केवळ कागदावरच राहिली, असंही विखे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात विखे यांनी हे विधान केल्यानं राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना स्वतःचा नालायकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष”

सरकारच्या नाकावर टिच्चून दहिहंडी फोडली; मनसेचा दावा

“सत्तेचा गैरवापर याआधी कधी झाला नसेल तर, सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारायला हवं”

“गेंडास्वामी घाबरला… इतकी फाटली तर, कशासाठी भानगडीत पडलास”