मुंबई : स्वतःचा नालायकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना असेल, असं म्हणत कोरोना निर्बंधांवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र सोडलंय.
कोरोनाचे नाव पुढे करून लूट माजवणाऱ्यांना दुसऱ्यांच्या संवेदना काय कळणार? या व्हिडीओमध्ये मी म्हणतो आहे की, वॉर्ड ऑफिसर फोन उचलत नाही. लोकांना बेड उपलब्ध होत नाही. हे कोणामुळे झालं, तर हे शिवसेनेच्या नालायकपणामुळे झालं. शिवसेना स्वतःचा नालायकपणा इतक्या जोराने दाखवणारा एकमेव पक्ष असेल, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
आपल्या टीव्ही-9 च्या एका पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी तुम्ही चॅनलचे काम बंद ठेवले नाही. बातम्या प्रसारित करण्याचे काम सुरू ठेवले. मग सरकार काम बंद का ठेवतं? असा सवालही संदीप देशपांडे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
सरकारच्या नाकावर टिच्चून दहिहंडी फोडली; मनसेचा दावा
“सत्तेचा गैरवापर याआधी कधी झाला नसेल तर, सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारायला हवं”
“गेंडास्वामी घाबरला… इतकी फाटली तर, कशासाठी भानगडीत पडलास”
“अनिल परब कितीही व्यस्त असले तरी त्यांनी, ईडीच्या चौकशीला सामोरं जायला हवं होतं”