मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर पोलिसांनी राणेंना अटक केली. त्यानंतर रात्री उशिरा त्याच दिवशी राणेंना जामीन मंजूर झाला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असा अप्रत्यक्ष इशारा संजय राऊतांनी राणेंना यावेळी दिला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणेंनी यावेळी दिला. तसेच शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असा विश्वास निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावं आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावं. शिवसेनेत आता आचार विचार राहिले नाहीत. शिवसेना आता केवळ आडवा आडवीची कामं करते. त्यामुळे आम्ही शिवसेनेला किंमत देत नाही, असंही निलेश राणेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी
10 दिवसात मंदीरे खुली करा अन्यथा…; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा
अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू; संजय राऊतांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष इशारा
महाविकास आघाडी पाच वर्ष नाही, तर पुढील 25 वर्षे राज्याची सेवा करणार- सुप्रिया सुळे