Home महाराष्ट्र मदिरालयांवर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही; सुधीर मुनगंटीवारांचा सरकारवर हल्लाबोल

मदिरालयांवर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही; सुधीर मुनगंटीवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची पार पडलेल्या बैठकीत राज्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉटेल, रेस्टॉरंट, विवाह सोहळे आदिंना मोठा दिलासा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र या निर्बंधात धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही. दारुवाल्यांना सूट देणारं, बार मालकांना सूट देणारं हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे. हे जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, जे बीअर बार आणि दारुमालकांना सूट देतात. मेट्रोचं उद्धाटन चालतं, पुण्यातील कार्यालयाचं उद्घाटन चालतं, डान्सबार सुरु केले तरी यांना चालतं, त्यामुळे कोरोना होत नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

दरम्यान, दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा केली तर कोरोना येतो असं राज्यातील थोर नेत्यांना वाटत असल्याची टीका देखील मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“RCB साठी खुषखबर! भारताची डोकेदुखी वाढविणारा अष्टपैलू खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात”

“लाॅकडाऊन लावण्याशिवाय मुख्यमंत्र्यांना येतं तरी काय?; खंडणी गोळा करता येते म्हणा”

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार?; गुलाबराव पाटील करणार मध्यस्थी

…निदान समोरासमोर दोन हात करायची हिम्मत तरी दाखवा; निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा