Home पुणे “मोठी बातमी! गेल्या 4 दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले रूग्णालयात, पुण्यात उपचार सुरू”

“मोठी बातमी! गेल्या 4 दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले रूग्णालयात, पुण्यात उपचार सुरू”

पुणे : एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले गेल्या चार दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

उदयनराजे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर पुण्यामधील रूबी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दिल्लीवरून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजत आहे. त्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं.

दरम्यान, उदयनराजेंची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचं समजतंय. तसेच येत्या 2 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का?; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोतांचा सवाल

अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं; रावसाहेब दानवेंचा टोला

“ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची तब्येत पुन्हा बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

नारायण राणेंचं ठरलं: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने करणार यात्रेची सुरूवात