Home महाराष्ट्र आमचं ठरलंय! 2024 ला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही; संजय राऊतांचं मोठं विधान

आमचं ठरलंय! 2024 ला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही; संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई : पावसाळी अधिवेशना दरम्यान संसदेत झालेला गोंधळ मोठा होता. या गोंधळामुळं विरोधक हे सरकारवर प्रचंड टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकार हे हुकूमशहा सारखं वागायला लागलं आहे. या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे. लोकसभा 2024 साठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. मोदी सरकारला विरोध करण्यासाठी देशातील सगळे विरोधक एकत्र येण्यावर आमचं एकमत झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी संजय राऊत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

इथं लोकांना प्यायलं पाणी नाही आणि नावं कसली बदलताय?; औरंगाबादच्या नामांतरावरून इम्तियाज जलील कडाडले

मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळेच मी आज इथंवर पोहोचलो- डाॅ.भागवत कराड

“महाराष्ट्रात यावेळी असा वणवा पेटवू की, त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

बैलगाडी शर्यतीसाठी गोपीचंद पडळकरांनी फुंकलं रणशिंग; 20 ऑगस्टला सांगलीत आयोजन