औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, त्याचप्रमाणे चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात- अमोल मिटकरी

0
406

मुंबई : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता.

ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार, असं अजित पवार म्हणाले होते. यावरून चंद्रकांत पाटीलांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला. आता यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील 15 वर्षे महाविकासआघाडीची सत्ता असेल, असा विश्वास मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा- नाना पटोले

खंडणी आणि वसूली हाच शिवसेनेचा धंदा; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“जळगावमध्ये भाजपला धक्के सुरूच; आणखी 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

“विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here