नागपूर : आगामी नागपूर महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजप यांना मोठा धक्का दिला आहे. फडणवीस यांच्या गृहनगरातील भाजपचा मुस्लिम नेता आणि इतर पक्षातील नेत्यांनी आपल्या समर्थकांसह हाती शिवसेबंधन बाधंलं आहे.
शिवसेनेचे आमदारदुष्यंत चतुर्वेदी आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नईम खान, भाजपचे वरिष्ठ कार्यकारी सदस्य चेतन कश्यप, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पश्चिम नागपूर अध्यक्ष संजय गुप्ता, माजी शहर सचिव सोनू खान, समाजसेवक संजय बारई यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार शिवसेनेत दाखल झाले.
दरम्यान, हा पक्षप्रवेश भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून त्याचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर दिसून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“आम्हाला अडविण्यासाठी महिला कमांडो आणताय, ही कसली तुमची मर्दानगी”
रावसाहेब दानवेंनी रूग्णालयात बसून पैसे वाटले, म्हणून माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गाैफ्यस्फोट
संभाजीराजेंना बोलू द्या; संजय राऊत राज्यसभेत भडकले
“रोहिणी खडसे अध्यक्षा असलेल्या बँकेला ईडीची नोटीस”