मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक काल पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, विवाह सोहळे आदिंना मोठा दिलासा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
आपण निर्बंध शिथिल केले असले आणि तिसरी लाट येणार की येणार नाही याचे अंदाज करीत असलो, तरी या विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिलेच पाहिजे., असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्याच नव्हे तर देशासमोर कसे आव्हान उभे ठाकले आहे ते अजून ताजे आहे. आणि म्हणूनच यावेळी आम्ही राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती, त्यामुळे सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची ( सुमारे 30 हजार रुग्णांसाठी) कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की, राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल., असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबईतल्या समुद्रात 50 हजार कोटींचा पूल उभारणार- नितीन गडकरी
“ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार म्हणून होईल”
ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली; काँग्रेस
प्रीतम मुंडे यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ जे वक्तव्य केलं ते…- संभाजीराजे