मुंबई : इयत्ता अकरावीची सीईटी रद्द करण्याचे आदेश काल उच्च न्ययालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार आम्ही अनेक बाबी लक्षात आणून दिल्या. न्यायालयाने फटकारले. तरीही लहरी सरकार काहीही शिकलेच नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
दरम्यान, विद्यार्थी, पालकांना प्रचंड मानसिक तणाव देऊन, शिक्षणाचा राज्यात अभूतपूर्व घोळ घालणाऱ्या, आघाडी सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची इयत्ता कंची?”, असही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार आम्ही अनेक बाबी लक्षात आणून दिल्या. न्यायालयाने फटकारले. तरीही लहरी सरकार काहीही शिकलेच नाही..
शिक्षणाचा हा अभूतपूर्व घोळ घालणाऱ्या आघाडी सरकारला आता विचारावेसे वाटते
तुमची “इयत्ता कंची?”
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
आरक्षणावर नारायण राणे का बोलले नाहीत?; संजय राऊतांचा सवाल
“राज्यातील निर्बंधांमध्ये शिथीलता, वाचा नवी नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?”
“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”
अशोकराव, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा- चंद्रकांत पाटील