Home महाराष्ट्र “राज्यातील निर्बंधांमध्ये शिथीलता, वाचा नवी नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?”

“राज्यातील निर्बंधांमध्ये शिथीलता, वाचा नवी नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?”

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. तसंच निर्बंधांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, विवाह सोहळे आदिंना मोठा दिलासा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

नवी नियमावलीनुसार वाचा काय सुरू, काय बंद…

हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेनं रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.

विवाह सोहळ्यांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेनं परवानगी देण्यात आली आहे.

सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांना तातडीने लस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सिनेमागृह , नाट्यगृह , धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.

इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

अशोकराव, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा- चंद्रकांत पाटील

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘या’ माजी प्रदेश उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल”

संजय राऊतांचं वक्तव्य पाहून असं वाटतं की, त्या सगळ्या बाटल्या त्यांनीच रिकाम्या केल्या- निलेश राणे