3 महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो- रावसाहेब दानवे

0
224

परभणी : येत्या 2 ते 3 महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपलं सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. ते परभणीत पत्रकारांशी बोलत होते.

कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे 3 पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल.. असं म्हणत दानवेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आपल्याला एकाचे पाच आणि पाचाचे पन्नास करायचे. कुटुंब नियोजन करायचं का? पक्ष वाढला पाहिजे. विधानसभा लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिली निवडणूक आहे, आपल्याला यश मिळालं पाहिजे, असं म्हणत कार्यकर्त्यांना कामं जोमाने करण्याचं आवाहन रावसाहेब दानवेंनी केलं.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवारांना ‘जे’ छोटे नेते म्हणालेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही”

“शहीद जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत देणार”

भाजपला सांगितलं होतं पवारसाहेबांचा नाद करु नका, पण ते सुधारणार नाहीत”

“साऊथ सुपर स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना ठरली नॅशनल क्रश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here