Home महाराष्ट्र पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी...

पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो- महादेव जानकर

औरंगाबाद : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर, पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही, असं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला होता. यावर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली.

पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. तिच्यावर काही अन्याय झाला असेल तर माझ्या बहिणीनं मला सांगावं, मग बघू, असा इशारा महादेव जानकर यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मराठवाड्याचं वॉटर ग्रीड भगवानगडावर व्हावं. असं झाल्यास मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असंही महादेव जानकर यांनी यावेळी म्हटलं. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“दिल्लीत खलबतं सुरूच; देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की…; आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला

“मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या लोकल रेल्वेच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे”

“महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये”