परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 3 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोलीनंतर आज ते परभणीत आहेत. यावेळी ते बांबू लागवड प्लॉटला भेट देणार आहेत. तसेच शेतीविषयक अवजारांची पाहणीदेखील ते करणार आहेत. यावेळी राज्यपालांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं.
नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बांबू लागवडीला नितीन गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या, असं भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरूंना सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झालाय; नितेश राणेंचा घणाघात
…मग आता नरेंद्र मोदी स्टेडियम चे नांव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार?; भाई जगताप यांचा सवाल
राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण- संजय राऊत
“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?”