Home महाराष्ट्र राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण- संजय...

राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण- संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून त्याला आता हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद याचं नाव दिलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राजीव गांधी मोठे नेते होते… नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचे धोरण आहे, अशा शब्दात सरकारने घेतलेल्या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका केली. तर ध्यानचंद हे मोठे खेळाडू आहेत त्याबद्दल वाद नाही, पण नावांचं राजकारण कशासाठी?, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मोदी सरकारवर यावेळी केला.

सरकारच्या निर्णयावर आम्हाला काही म्हणायच नाही… याआधीही असे अनेक निर्णय घेतले आहेत… नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण आहे… ध्यानचंद हे मोठे खेळाडू आहेत… एखादं नाव पुसून दुसरं नाव दिले जातं… त्यामुळे वेगळं वाटतं”, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?”

“शिवसेनेचे भाजपसोबत कायमचे शत्रुत्व नाही”

राज ठाकरे मोठे नेते व्हावे ही महाराष्ट्राची इच्छा- चंद्रकांत पाटील

“राजीनामा द्या, अशी जनतेची मागणी”; ‘खेलरत्न’च्या नामांतरावरुन रुपाली चाकणकरांचा टोला