मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधात राज्य सरकारने सुट दिलेली नाही. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
पुण्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा 4 टक्के असताना पुणे का सुरू झालं नाही, हे मला समजत नाही. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा, असं अमृता फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. यावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
आमच्या लाडक्या अमृता फडणवीस यावेळी पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथं त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांना कोणतेही काम नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी, असा टोला मनिषा कायंद यांनी यावेळी अमृता फडणवीसांना लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
महापुराच्या नावाखाली शिवसेनेकडून मुंबईत नवी वसुली मोहिम- निलेश राणे
कोण अमृता फडणवीस?, ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था झालीये- किशोरी पेडणेकर
कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा- अमृता फडणवीस