Home महाराष्ट्र शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चांना उधान

शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चांना उधान

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पुणे भेटीचं निमंत्रण दिलं आहे. येत्या सप्टेंबरमध्ये शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पवार-शहा यांच्या भेटीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट घेतली होती. शहा यांच्याकडे सहकार खाते आल्याने सहकार खात्याशी संबंधित मुद्द्यांबाबत ही भेट होती. त्यात महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवरही चर्चा झाल्याचं समजतं. यावेळी पवारांनी शहांना थेट महाराष्ट्र भेटीचं निमंत्रण दिलं आहे. पवारांच्या या निमंत्रणावरून शहा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत.

दरमयान, अमित शहांना पुण्यात बोलावून शरद पवार काय काय साध्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं; पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं

ज्यांनी ज्यांनी भाजपला सोडले, त्यांची दुर्गतीच झाली; आशिष शेलारांचा खडसेंना टोला

“आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राज्यांना देऊन फायदा नाही, तर…”

…म्हणून नारायण राणेंना मंत्रिपद देण्यात आलं- पृथ्वीराज चव्हाण