Home महाराष्ट्र बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं; पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं; पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गएक गाणं लिहिण्यात आलं आहे. किशाबाई सौंदरमल यांनी हे गाणं गायलं आहे. किशाबाई आणि त्यांचा मुलगा प्रथम सौंदरमल  यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडेंसमोर किशाबाईंनी गाणं गायिलं. हे गाणं ऐकून पंकजा मुंडे भारावून गेल्या. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

“किशाबाई सौंदरमल यांची आणि माझी पहिली भेट आज झाली… मुलगा प्रथम सौंदरमल हा उत्तम लिहितो आणि मुलगी सुंदर गाते… त्यांच्या कष्टाच्या जीवनातील दोन क्षण दिलासा., असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

गाण्याचे बोल?

का वागू रे बेकीनं, राहा विचार एकीनं,

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं,

बीड जिल्ह्याचं नाव केलंsss मुंडे साहेबांच्या लेकीनं

मंत्रिपदावर असताना नाही कशाचीच हाव,

काय सांगतात जनतेला तुमचं हावं प्रेम व्हावं

मनोभावे सेवा करीन, तुमची रात्रं आणि दिन

बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं

महत्वाच्या घडामोडी –

ज्यांनी ज्यांनी भाजपला सोडले, त्यांची दुर्गतीच झाली; आशिष शेलारांचा खडसेंना टोला

“आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राज्यांना देऊन फायदा नाही, तर…”

…म्हणून नारायण राणेंना मंत्रिपद देण्यात आलं- पृथ्वीराज चव्हाण

“अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडं अशी झालीये”