भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय- एकनाथ खडसे

0
198

जळगाव : भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृत्वावर जोरदार निशाणा साधलाय.

मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपनं नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. पण गेल्या 4 – 5 वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपमध्ये असताना नाराज एकनाथ खडसे यांनी फडणवीसांविरोधात मोर्चा वळवला होता. फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप करत त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप सरकार कोरोनाबळींचे खोटे आकडे दाखवतंय”

मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनले आहे- नवाब मलिक

“ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी कोरोना पाॅझिटिव्ह”

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं भाग्य”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here