“उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, आज ना उद्या ते नक्की आघाडीतून बाहेर पडतील”

0
163

पुणे : माजी खासदार तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरे यांना मी चांगला ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, आज ना उद्या ते नक्की आघाडीतून बाहेर पडतील, असं वक्तव्य संजय काकडे यांनी केलं. तसेच उद्धव ठाकरे हे जास्त वेळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, गेली 25 वर्षे ते युतीमध्ये होते. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून मला वाईट वाटत आहे, असा टोलाही संजय काकडेंनी यावेळी लगावला.

दरम्यान, संजय काकडे यांची काल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“आरोग्य विभागात भरती करण्याचा निर्णय आता घेतला जातोय, वर्षभर ठाकरे सरकार झोप काढत होतं का?”

“अशोक चव्हाणांना कायदा कळत नाही, त्यामुळे ते मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेड पांघरून पेडगावला जात आहे”

“मराठा समाजाला कळून चुकलंय की, आरक्षणाच्या निर्णयाला पूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार”

अवघा देश बुडेल, असे यांचे महाराष्ट्र मॉडेल; अतुल भातखळकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here