Home महाराष्ट्र “आम्हांला कोणी थप्पड देण्याची भाषा करू नये, अशी थप्पड मारू की कोणी...

“आम्हांला कोणी थप्पड देण्याची भाषा करू नये, अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही”

मुंबई : हे ट्रिपल सीट सरकार आहे. आता कोणी कौतुक केलं, की भीती वाटते. थप्पड से नही… थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना दिला.

मुंबईच्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला.

दरम्यान, आज भूमिपूजन केलं. 36 महिन्याने आपण सगळे एकत्र चाव्या देऊ. आयुष्य काही-काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. लहानपणापासून या परिसरात येणं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत यायचो. भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, हे स्वप्नात पाहिले नाही. माझ्यावर लोकांनी पुष्पवृष्टी केली. पण आम्ही लोकांच्या ऋणात आहोत. मुंबईने, मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वतःची हक्काची घरं झाल्यावर मोहाला बळी पडू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी रहिवाशांना यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

कोल्हापुरातील भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले…

प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू; संजय राऊत म्हणतात…

“केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावं लागल्याने बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला अलविदा”

“राज्यातील बारावी परीक्षांचा निकाल उद्या 2 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता”