Home महाराष्ट्र मराठा आरक्षण! “गनिमी कावा करा”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

मराठा आरक्षण! “गनिमी कावा करा”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत अत्यंत निराशाजनक असा निकाल असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतऱ उच्च न्यायालयात याचिका झाली आणि आपल्या बाजूने निकाल दिला आणि कायदा वैध ठरवला. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका आली. आपण तिथे मजबूतीने बाजू मांडली. आज मांडलेत तेच विषय तेव्हाही मांडले होते. त्यावेळी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद आपण केला आणि सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला आणि स्पष्टपणे कायदा सुरु राहील असं सांगितलं होतं. नंतर जेव्हा नवीन खंडपीठ तयार झालं आणि त्यांच्याकडे प्रकरण गेलं त्यावेळी आताच्या सरकारने ज्या बाबी मांडल्या त्यात कुठेतरी समन्वयाचा अभाव पहायाल मिळाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दोन तीन वेळा वकिलांना आपल्याकडे माहिती नाही असं सांगावं लागलं. खरं तर सुप्रीम कोर्टाचा एक अलिखित नियम आहे. कायद्याला कधी स्थगिती मिळत नाही, अध्यादेशाला मिळते. पण तरीदेखील या समन्वयाच्या अभावानातून कायद्याला स्थगिती मिळाली त्याचवेळी आमच्या मनात संशयाची पाल चुकचूकली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

न्यायालयीन लढाई लढत असताना गनिमी कावा करण्याची गरज आहे. गनिमी कावा याचा चुकीचा अर्थ काढू नये. न्यायालयीन लढाईत आपला मुद्दा बरोबर आहे यासाठी तो वेगवेगळ्या पद्दतीने मांडावा लागतो. समोरचा मुद्दा चुकीचा आहे हे पटवून देण्यासाठी युक्तिवाद आणि कायदेशीर दावे करावे लागतात. येत्या काळात याची गरज आहे,” असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल- अजित पवार

“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश”

मराठा समाजाच्या दृष्टीने हा अत्यंत दुर्दैवी दिवस- संभाजीराजे भोसले

मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय