Home महाराष्ट्र “थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची...

“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. यावेळी एका अधिकाऱ्याला नारायण राणे झापत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“लोकांचा आक्रोश पाहून नारायण राणे संतापले होते. लोकांच्या संतप्त भावना पाहून त्यांनी ती चिड व्यक्त केली,” असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, तुम्हाला सोडू का? तुम्हाला माॅबमध्ये सोडू का ? असा सवाल नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी प्रविण दरेकर मध्ये काहीतरी बोलले. त्यावर नारायण राणे यांनी दरेकरांना झापलं. ‘ए तु थांब रे…! मध्ये बोलू नको, असं नारायण राणे दरेकरांना म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

“बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते कलेक्शन ऑफिस झालंय”

“शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो; प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल”

…तर सेना भवन फोडू; प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य