नवी दिल्ली : दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी म्हणुन राकेश अस्ताना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दिल्ली सरकारने राकेश अस्ताना यांच्या नियुक्तीला विरोध केला असून त्याविरूद्ध विधानसभेत प्रस्ताव पारित केला आहे. यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.
ज्येष्ठ वकिल मनोहर लाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरूद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, राकेश अस्ताना यांची केलेली नियुक्ती ही नियमबाह्य असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळेच या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका दाखल केल्याचं मनोहर लाल शर्मा यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…तर सेना भवन फोडू; प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य
“शिवसेनेत माज पाहिजेच, मग कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल”
गडकरीसाहेब महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज- उद्धव ठाकरे
“रिकामटेकडे दौरा करतात की टीका करतात, हे महाराष्ट्राची जनता पाहतेय”