महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपाने मी हललोय.. या परिस्थितीतून सावरण्यासाठी एका दिवसाची सुट्टी द्यावी

0
212

चंद्रपूर : महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणारी घटना एका रात्रीत घडली आहे. आज सकाळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या हादऱ्याने एक विद्यार्थी देखील कोलमडून पडलाय. त्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून आपल्या भावना मांडल्या आहेत.

आज महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपाने मी हललोय. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्यासाठी मला एका दिवसाची सुट्टी द्यावी, अशी विनंती करणारं पत्र जहीर एस. सय्यद या सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थाने प्राचार्यांना लिहिलं आहे.


चंद्रपूरच्या कोपरना तालुक्यात गडचांदुर या गावात हे महाविद्यालय आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रजा नामंजूर…, अशा शेरा प्राचार्यांनी विद्यार्थाच्या अर्जावर मारला आणि साहजिकच जहीर सय्यद याला रजा मिळाली नाही.

दरम्यान, सय्यदने लिहिलेलं हे पत्र आता सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here