पंतप्रधान नरेंद्र मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस आहे; नाना पटोलेंचा हल्लाबोल

0
174

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते. मात्र पंतप्रधान मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या. पण सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असं म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा पोरखेळपणा केला, असं म्हणत नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदी व भाजपच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.

तुम्ही हे वाचलात का?

IPL-21 मुंबई इंडियन्स Vs सनरायझर्स हैदराबाद! मुंबईने टाॅस जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय

दरम्यान, लोक वैद्यकीय उपचाराअभावी प्राण सोडत असताना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची मोदींची हौस अजून संपलेली दिसत नाही. गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदींची नोंद होईल, असा टोमणाही नाना पटोले यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू- नवाब मलिक

“कोरोनाच्या काळात ‘गरीबांचा मसिहा’ बनलेल्या अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण”

“पंतप्रधान मोदींच्या जागी आणखी कोण असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here