मुंबई : आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापुजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. या महापुजेसाठी उद्धव ठाकरे यांनी कार स्वत: आठ तास ड्राईव्हिंग करत पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. यावरून भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात, असं लिहिलं आहे.
दरम्यान, हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’. जशी विठ्ठलाची भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेऊ दे हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना, असं म्हणत संदिप देशपांडे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पालकमंत्री बदला सांगली जिल्हा वाचवा; निलेश राणेंची जयंत पाटलांवर टीकास्त्र
फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळातील- देवेंद्र फडणवीस
“शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य”
“अश्लिल चित्रपटाच्या चित्रीकरणावरून शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा यांना अटक”