Home महाराष्ट्र “…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”; जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”; जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान कार्यालयात भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? या मुद्द्यावर वेगवेगळे राजकीय तर्क लढवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  स्पष्टीकरण दिलं आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील राजकारण, शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या चर्चा, स्वतंत्र सहकार खातं आणि राज्यातील सहकार क्षेत्र, राज्यातील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अशा अनेक मुद्द्यांचे अंदाज बांधले जात होते. मात्र, शरद पवारांनी नेमकी कशासाठी पंतप्रधानांची भेट घेतील होती, याविषयी जयंत पाटलांनी खुलासा केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पंतप्रधान मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं यूपीमधलं अपयश लपत नाही”

…त्यामुळे विरोधकांनी शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नये- रामदास आठवले

“मुंबईत झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरूवात; अतुल भातखळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक- प्रवीण दरेकर