मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्यानंतर गांधी कुटुबीयांची भेट घेतल्यामुळे शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं जाणार असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या आहेत.सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
ट्विटर हे एकच माध्यम राहिले होते जिथे लोकं स्वतःची निर्भिड बाजू मांडत होते. एखादा व्यक्ती चुकीची माहिती टाकत असेल किंवा खोटी अफवा पसरवत असेल तर आयटी सेलच्या विविध कलमान्वये त्यांच्यावर कारवाई होत होती. ट्विटरवर कुणाचा अंकुश नव्हता, परंतु आता केंद्र सरकार थेट ट्विटरवर अंकुश ठेवणार आहेत,” असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय मुख्यमंत्री झाले; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं काैतुक”
“राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?”
“भारताचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत कोरोना पाॅझिटिव्ह”
“राज्यातील दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उद्या लागणार निकाल”